शुक्रवारी या पद्धतीने करा शुक्र स्तोत्राचे पठण; लक्ष्मीच्या कृपेनं कामात मिळेल यश – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 07 जुलै : शुक्रवारचा दिवस संपत्तीची देवता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. तसेच हा दिवस शुक्र ग्रहाचे प्रतीक देखील आहे. शुक्र हा माणसाला भौतिक सुख आणि सुविधा देणारा ग्रह मानला जातो. ज्योतिषी सांगतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, तेव्हा व्यक्तीला पैसा, संपत्ती, सुख आणि सुविधा प्राप्त होतात. शिवाय जर शुक्र कमजोर असतो तेव्हा व्यक्तीमध्ये वरील या गोष्टींचा अभाव असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळाव्यात, अशी इच्छा असते आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती विविध उपाय करतो. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला बलवान बनवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी एक उपाय म्हणजे शुक्र स्तोत्राचे पठण. शुक्र बलवान होण्यासाठी दर शुक्रवारी शुक्राच्या बीज मंत्राचा जप करावा. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर दर शुक्रवारी शुक्र स्तोत्राचा पाठ केल्यास फायदा होईल.

News18लोकमत


News18लोकमत

या पद्धतीने शुक्र स्तोत्राचा पाठ करा – ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी स्नान करावे आणि नंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. यानंतर लक्ष्मीची मूर्ती पूजास्थानी स्थापन करून तिची पूजा करावी. शुभ्र आसनावर बसून शुक्र स्तोत्राचा पाठ करा. शुक्र स्तोत्राचा मजकूर संस्कृतमध्ये लिहिला आहे, म्हणून वाचताना, शब्दांचा उच्चार योग्यरित्या करा. या पाठाचा जप योग्य आणि पद्धतशीरपणे केला तर त्याचा लवकरच फायदा होतो.
Budh Rashi Parivartan: 8 जुलैपासून या राशींचे अच्छे दिन, होईल धनवर्षा
शुक्र स्तोत्र नमस्ते भार्गव श्रेष्ठ देव दानव पूजित। वृष्टिरोधप्रकर्त्रे च वृष्टिकर्त्रे नमो नम:।। देवयानीपितस्तुभ्यं वेदवेदांगपारग:। परेण तपसा शुद्ध शंकरो लोकशंकर:।। प्राप्तो विद्यां जीवनाख्यां तस्मै शुक्रात्मने नम:। नमस्तस्मै भगवते भृगुपुत्राय वेधसे।। तारामण्डलमध्यस्थ स्वभासा भसिताम्बर:। यस्योदये जगत्सर्वं मंगलार्हं भवेदिह।। अस्तं याते ह्यरिष्टं स्यात्तस्मै मंगलरूपिणे। त्रिपुरावासिनो दैत्यान शिवबाणप्रपीडितान।। विद्यया जीवयच्छुक्रो नमस्ते भृगुनन्दन। ययातिगुरवे तुभ्यं नमस्ते कविनन्दन।। बलिराज्यप्रदो जीवस्तस्मै जीवात्मने नम:। भार्गवाय नमस्तुभ्यं पूर्वं गीर्वाणवन्दितम।। जीवपुत्राय यो विद्यां प्रादात्तस्मै नमोनम:। नम: शुक्राय काव्याय भृगुपुत्राय धीमहि।। नम: कारणरूपाय नमस्ते कारणात्मने। स्तवराजमिदं पुण्य़ं भार्गवस्य महात्मन:।। य: पठेच्छुणुयाद वापि लभते वांछित फलम। पुत्रकामो लभेत्पुत्रान श्रीकामो लभते श्रियम।। राज्यकामो लभेद्राज्यं स्त्रीकाम: स्त्रियमुत्तमाम। भृगुवारे प्रयत्नेन पठितव्यं सामहितै:।। अन्यवारे तु होरायां पूजयेद भृगुनन्दनम। रोगार्तो मुच्यते रोगाद भयार्तो मुच्यते भयात।। यद्यत्प्रार्थयते वस्तु तत्तत्प्राप्नोति सर्वदा। प्रात: काले प्रकर्तव्या भृगुपूजा प्रयत्नत:।। सर्वपापविनिर्मुक्त: प्राप्नुयाच्छिवसन्निधि:।।
Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *