रेल्वेत लोको पायलट व्हायचंय? मग काय असते पात्रता? कोणती परीक्षा देणं IMP? इथे मिळेल माहिती – News18 लोकमत

[ad_1]

मुंबई, 20 जून: लोको पायलट हे भारतीय रेल्वेमधील वरिष्ठ स्तरावरील पद आहे. लोको पायलट ट्रेन चालवण्याचं आणि ट्रेनच्या हालचाल दरम्यान तिची योग्य देखभाल करण्याचं काम करतात. ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही लोको पायलटची असते. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा जॉब आहे. जर तुम्हालाही लोको पायलट व्हायचं असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला रेल्वेत लोको पायलट कसं व्हावं आणि त्यासाठी परीक्षा पात्रता आणि वयोमर्यादा काय असते हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. लोको पायलटच्या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराला थेट लोको पायलट पद दिले जात नाही. भारतीय रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी एक प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. यानंतर लोको पायलट पदासाठी उमेदवारांना बढती दिली जाते. वेळ आणि अनुभवासह, उमेदवाराला वरिष्ठ लोको पायलट पद दिले जाते.
Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्याच्या 3 विभागांत सर्वात मोठ्या पदभरतींची घोषणा; काय असेल पात्रता? बघा डिटेल्स
लोको पायलट होण्यासाठी उमेदवार 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावा. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा ऑटोमोबाईल अशा कोणत्याही ट्रेडमध्ये 2 वर्षांचा I.T.I. अभ्यासक्रम अनिवार्य आहे. यासाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. लोको पायलट होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सवलत दिली जाते. या परीक्षा देणं आवश्यक लोको पायलट होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांत रेल्वेची परीक्षा द्यावी लागेल.
JOB ALERT: राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात ग्रॅज्युएट्ससाठी पदभरतीची घोषणा; किती असेल पगार? बघा डिटेल्स
लेखी परीक्षा ही परीक्षा 120 गुणांची असते. ते सोडवण्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटे देण्यात आली आहेत. त्यात यशस्वी झाल्यानंतरच मुलाखतीसाठी बोलावले जाते.
ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; ‘या’ महापालिकेत बंपर ओपनिंग्स
मुलाखत यामध्ये उमेदवारांकडून या पदाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत जे उमेदवार यशस्वी होतात, त्यांची आरोग्य चाचणी केली जाते.

News18लोकमत


News18लोकमत

वैद्यकीय चाचणी यामध्ये अर्जदाराची नेत्र तपासणी अनिवार्यपणे केली जाते. या चाचणीमध्ये, आपण दूरच्या किंवा जवळच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो की नाही हे पाहिले जाते. या पदासाठी तीनही परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *