नितीन गडकरींच्या भाषणातून मिळाली प्रेरणा, गृहिणी झाली उद्योजक, Video – News18 लोकमत

[ad_1]
अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 20 जून: ग्रामीण भागात कलाकार महिलांची कमी नाही. त्यात अनेक सुशिक्षित महिलांना आपण काहीतरी नवीन करावं असं सतत वाटत असतं. अशीच एक नवीन संकल्पना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (शामजी पंत) येथील सुशिक्षित गृहिणीला सुचली. आपण जे काही करावं ते पर्यावरण पूरक आणि ग्रामीण महिलांना रोजगार देणार असावं असं त्यांना वाटलं आणि या गृहिणीने चक्क बांबू हस्तकलेचा लघु उद्योगच सुरू केला. निकिता मयूर वानखेडे असे या गृहिणीचे नाव आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बांबुवरील भाषणातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं निकिता सांगतात. गडकरींच्या भाषणामुळे प्रेरणा निकिता यांना एकदा सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडिओ दिसला. त्यांनी त्यांचे बांबू विषयावरील भाषण पूर्ण ऐकलं आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली. निकिता यांनी बांबू रिसर्च सेंटर चंद्रपूर येथे भेट देऊन माहिती गोळा करायला सुरुवात केली. प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला. काही महिला त्यांच्याकडे या वस्तू कशा बनवाव्यात याचे प्रशिक्षण देखील घेत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
News18लोकमत
आतापर्यंत बनवल्या या वस्तू मागील 3 महिन्यातच बांबू हस्तकलेच्या 40 ते 50 प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक वस्तू निर्मिती केली जाते. बांबू हस्तकला करून अतिशय सुबक व बारीक काम असलेल्या वस्तू बनवल्या जातात. उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील, चहाकप, मोबाईल स्टॅण्ड, फुलदाणी, मोबाईल स्पीकर स्टॅण्ड, फ्रुट स्टॅण्ड, टेबल लॅम्प, शो-पीस, बैल गाडी, शिप अशा 40 ते 50 प्रकारच्या वस्तू येथे तयार केल्या जात आहेत.
जिंकलंस पोरी! चिमुकल्या अर्णवीचा भरतनाट्यममध्ये विक्रम, पाहा Video
महिलांच्या कलागुणांना मिळाला वाव निकिता यांच्या या व्यवसायामुळे गावातील महिलांना रोजगार मिळाला. सोबतच केवळ शेतीतील काम करणाऱ्या महिला किंवा तरुणी आपल्या नवनवीन संकल्पना या वस्तूंच्या माध्यमातून जागृत करण्याची संधी मिळाली. त्यांच्यातील कलागुणांना देखील वाव मिळतो आहे. महिला अतिशय आत्मविश्वासाने काम करताना दिसून येत आहेत. बांबू पासून बनवलेल्या या वस्तू विक्री करण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचाही वापर निकिता करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link