जेईई एडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर, इथे करा चेक – News18 लोकमत

[ad_1]

दिल्ली, 18 जून : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आज जेईई एडवान्सचा निकाल जाहीर केला. जेईई एडवान्समध्ये व्हीसी रेड्डीने 341 गुणांसह अव्वल रँक पटकावली. तर एन एन भाव्या श्री ही मुलींमध्ये पहिली आली. एकूण 360 गुणांसाठी ही परीक्षा झाली. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित अशा तीन विषयांचे प्रत्येकी 120 गुणांचे पेपर झाले. जेईई एडवान्स परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
jeeadv.ac.in
या संकतेस्थळावर निकाल चेक करता येतो. त्यासाठी बैठक क्रमांक, जन्मतारीख आणि नोंद केलेला मोबाईल नंबर इत्यादी माहिती आवश्यक आहे. जेईई एडवान्स परीक्षा 4 जून रोजी आयोजित केली होती. निकालासोबतच फायनल अन्सर की सुद्धा जारी करण्यात आली आहे.
`ही` आयटी कंपनी करणार 1300 इंजिनीअर्सची भरती; चॅट जीपीटी सेवेसाठी राबवली जाणार प्रक्रिया
  निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासून जॉइंट सीट अलॉकेशन अथॉरिटीकडून काउन्सिलिंग सुरू होणार आहे. ज्या उमेदवारांनी जेईई एडवान्समध्ये रँक पटकावली असेल ते आयआयटीसाठी जॉइंट सीट अलोकेशन प्रक्रियेला पात्र असतील. ही प्रक्रियेतून देशभरातील आयआयटी, एनआयटी आणि आय़आय़आय़टीसह सरकारी अनुदानातून चालवल्या जाणाऱ्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये उमेदवारांना प्रवेश मिळतो. जेईई एडवान्सच्या निकालासोबतच फायनल अन्सर की जारी करण्यात आलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *