बापाच्या खात्यात पैसे आल्यावर समोर आली अभिमानास्पद बाब! मुलीने केली ही कमाल…VIDEO

[ad_1]

शाश्वत सिंह, प्रतिनिधी झांसी, 14 जून : एका प्रसिद्ध चित्रपटातील एक संवाद आहे… अगर तेरे मुक्का में है दम, तो दुनिया चुमेगी कदम. हा संवाद खरा असल्याचे झाशी येथील रहिवासी असलेल्या रुक्सार बानोने दाखवून दिले आहे. रुक्सार बानो ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू राहिली आहे. सध्या झाशी येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत ती प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. न्यूज 18 लोकलने तिच्याशी विशेष संवाद साधला. रुक्सार बानोने न्यूज 18 लोकलला सांगितले की, ती तिच्या बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. तिच्या आई-वडिलांनी तिच्या सगळ्या बहिणींची लहान वयातच लग्नं करून दिली, पण मी लग्न न करायचं ठरवलं. यानंतर ती कानपूरमध्ये बहिणीच्या घरी शिकू लागली आणि यासोबतच ती बॉक्सिंगच्या सरावासाठीही जायची. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला आणि ती स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.

News18लोकमत


News18लोकमत

रुक्सार बानोने पुढे सांगितले की, ती 3 वर्षे राष्ट्रीय स्तरावर खेळत राहिली, पण तिच्या कुटुंबीयांना याची माहिती नव्हती. विजयाचे पैसे वडिलांच्या खात्यात आल्यावर हा प्रकार त्याच्या वडिलांना कळला. रुक्सार बानोने सांगितले की, अनेकदा लोक टोमणे मारायचे. त्यामुळे ती तिच्या घरच्यांच्या कुठल्याच फंक्शनलाही जात नसे, पण हळूहळू तिची प्रगती होत गेली आणि एक वेळ अशी आली की, घराचा खर्च ती चालवू लागली.

बॉक्सिंग खेळण्यासाठी येणाऱ्या नवीन मुलींमध्ये मोठा उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबाच्या पाठिंब्याने या मुली देशाचे नाव उंचावतील. भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्तर प्रदेशातील अनेक मुली सुवर्णपदक मिळवून देतील, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *