पावसाळ्यात घरभर माश्या भिरभिरतात? मग 1 सोपा उपाय हा त्रास करतील दूर – News18 लोकमत

[ad_1]
पावसाळा ऋतू आला की घरात तसेच परिसरात डास, माश्या इत्यादींचे प्रमाण वाढते. घरात भिरभिरणाऱ्या माश्यांमुळे सर्वचजण हैराण होत असतात. या माश्या अनेकदा खाण्यापिण्याच्या पदार्थांवर बसतात ज्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अनेक घरगुती उपाय करून देखील या माश्या घरातून बाहेर जाण्याचं नाव घेत नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. तेव्हा पावसाळ्यात माश्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी 1 सोपा आणि रामबाण उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा उपाय केल्याने घरातील माशा काही वेळातच गायब होतात. पावसाळ्यात घरात येणाऱ्या माश्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तुमच्या घरातील प्लास्टिकचे रिकामे डबे, मीठ, डिश वॉश लिक्विड किंवा फॅब्रिक सॉफ्टनर तसेच फिनाईल गोळ्या प्रभावी ठरू शकतील. तेव्हा या साहित्यांचा वापर करून घरातील माशांना कशा प्रकारे पळवुन लावावे हे जाणून घेऊयात.
News18लोकमत
1. घरातील यूज आणि थ्रोचे प्लास्टिक डबे घेऊन त्यावर बारीक होल करा. हे होल डब्याच्या झाकणाच्या सर्व बाजुंनी असतील याची काळजी घ्या. 2. मग या डब्यांमध्ये अर्धा डबा भरून साधे मीठ ठेवा. 3. मीठ भरलेल्या डब्यांमध्ये फॅब्रिक सॉफ्टनर किंवा डिश वॉश टाका आणि एकजीव करून घ्या. 4. मग या मिश्रणात 2 ते 4 फिनाईलच्या गोळ्या टाका.
5. डबे बंद करून ते घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा जिथून माशा येतात अशाठिकाणी ठेवाव्यात. 6. या दोन्ही मिश्रणातून चांगला वास येत असल्याने घरात एअर फ्रेशनर मारण्याची गरज भासत नाही. 7. साधारणपणे हे डबे तासभर एका ठिकाणी ठेवल्यावर तेथे माश्या मरून पडलेल्या दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link