आज भानुसप्तमीला अशा पद्धतीने करा सूर्यपूजा; या गोष्टींमध्ये अनपेक्षित मिळेल लाभ – News18 लोकमत

[ad_1]
मुंबई, 25 जून : आज 25 जून 2023 रोजी भानुसप्तमी साजरी होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला भानुसप्तमी साजरी केली जाते. भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते, वय वाढते, व्यवसायात नफा आणि आरोग्यात लाभ होतो. धार्मिक ग्रंथानुसार, भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचे प्रथम दर्शन झाले. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास भानुसप्तमीच्या दिवसापासून सूर्यदेवाने आपल्या प्रकाशाने हे जग प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याला रथ सप्तमी, अचला सप्तमी, सूर्य रथ सप्तमी, सूर्य सप्तमी, आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून या दिवशी कोणत्या पद्धतीने पूजा करावी. भानुसप्तमीचे महत्त्व आठवड्यातील सात दिवसांपैकी रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो. सनातन धर्मात सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग आणि त्वचारोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्याने सूर्यदेवाची पूजा करावी. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाच्या पुत्रानेही पूर्वी सूर्यदेवाची पूजा केली होती. त्यामुळे सांबची कुष्ठरोगातून सुटका झाली. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर ज्योतिषी त्याला सूर्याला बल देण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा करण्याचा सल्ला देतात. तसेच, जर तुम्हाला व्यवसायात नफा हवा असेल तर सूर्यदेवाची उपासना करणे तुमच्यासाठी उत्तम राहील.
News18लोकमत
भानुसप्तमीची पूजा पद्धत धार्मिक मान्यतेनुसार भानु सप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर सर्व प्रथम भगवान सूर्यनारायणाला शुद्ध अंतःकरणाने नमस्कार करावा. त्यानंतर दैनंदिन कार्ये आटोपून स्वच्छ कपडे घाला. आता तांब्याच्या कलशात पाणी, रोळी, तीळ, तांदूळ, दुर्वा, लाल रंगाची फुले अर्पण करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
4 दिवसात या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग
यानंतर ॐ घृणि सूर्याय नमः और ओम सूर्याय नमः असा जप करताना सूर्यदेवाचे आवाहन करावे. पंचोपचारानंतर सूर्यदेवाची पूजा करावी. या दरम्यान सूर्य चालीसा, स्तुती, सूर्य स्तोत्र आणि सूर्य कवच पठण करावे. आता तुमच्या मनातील सुख-समृद्धीसाठीची इच्छेसाठी प्रार्थना करून सूर्यदेवाची आरती करा आणि तुमच्या कुवतीनुसार गरीब आणि गरजूंना दान करा.
Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link