Anuradha Dhawale owns Bonsai Garden … which includes 100 small and large trees …. – News18 लोकमत

[ad_1]
अकोला, 1 जून : अकोल्यातील अनुराधा ढवळे त्यांच्याकडे 100 हून अधिक बोन्सायची (Bonsai tree) झाडे आहेत. त्यामध्ये 35 वर्षाचं सर्वात जुनं झाडं आहे. अनुराधा यांना अनेक वर्षांपासून बोन्सायच्या झाडांचा छंद आहे. त्यांच्या या आवडीमध्ये त्यांच्या पतीचीदेखील साथ आहे. दोघां मिळून बोन्सायमधे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. अनेक वर्षापसून या झाडांच हे दाम्पत्य झाडांचं संगोपन करत आहे. त्यांनी घरामध्ये या झाडांचं सुंदर गार्डन (Bonsai Garden) केलेलं आहे. वाचा :
MS Dhoni च्या त्या निर्णयानंतर निवृत्त होणार होतो, पण सचिनने थांबवलं, Sehwag चा 14 वर्षांनंतर खुलासा!
अनुराधा ढवळे सांगतात की, “सुरुवातीपासूनच झाडांची आवड आहे. अनेक वर्षापासून हा छंद जोपासत आहे. छोट्या कुंडीत असलेले झाड म्हणजे बोन्साय! मूळात ही भारतीय कला आहे. बोन्सायला मराठीत वामनवृक्ष म्हणतात. ती जपानमध्ये (Japanese version) कला म्हणून जतन केली आहे. ज्या झाडांना अनेक फांद्या असतात आणि जी झाडे पसरट असतात, अशा झाडांचे बोन्साय होऊ शकते. माझ्याकडे अनेक प्रकारची बोन्सायची झाडे आहेत. त्यात लहान आणि मोठ्या झाडांचा समावेश आहे. 100 च्या जवळपास बोन्सायची झाडे आहेत. त्यात सर्वात जून झाड (Ficus variety) 35 वर्षाचं झाड आहे. हा छंद जोपण्यासाठी माझ्या पतीची साथ मोलाची ठरते. बोन्साय ही कला मला आवडणारी होती आणि मी ती विकसित केली.” झाडांपासून मिळते आत्मिक समाधान अनुराधा ढवळे सांगतात की, “आपल्या अवती-भोवती अनेक प्रकारचे वृक्ष-वेली आहेत. त्यांच्या सानिध्यात राहून आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. म्हणून बोन्साय सोबतचे माझे नाते जिव्हाळ्याचे आहे. उथळ तबकातील रोप म्हणजे बोन्साय. बोन्साय हा शब्द जपानी भाषेतला आहे. त्याला मराठी भाषेमध्ये वामनवृक्ष म्हणतात. वामनवृक्ष बनविणे ही एक कला आहे. ही कला बागकामाची माहिती असलेल्या व्यक्तिला अवगत असते. वामनवृक्षनिर्मिती कला अवगत करण्यासाठी लहान सहान कुंड्यांतून रोपे तयार करणे, त्यांना आकार देणे, त्याची काळजी घेणे, संगोपन करणे आणि तयार झालेल्या वामनवृक्षाचे सौंदर्य टिकवून ठेवणे हे महत्वाचे आहे. एकदा वामनवृक्ष लावला की झालं काम असे चालत नाही.” वाचा :
Corona रुग्णवाढीने वाढली चिंता; BMC कडून खासगी रुग्णालयांना अलर्ट, जम्बो कोविड सेंटरही सज्ज करणार
“वामनवृक्ष हा अनेक पद्धतीने तयार करता येतो. झाडाच्या मुळांना न कापता नैसर्गिक परिस्थितीत ठेवून फांद्यांना आकार देता येतो. वाढलेल्या फांद्यांना छाटून त्या झाडाची वाढ खुंटवून वामन वृक्ष तयार करता येतो. जंगलदन्यात किंवा कस नसलेल्या रेताड-खडकाळ जमिनीत पाण्याच्या अभावाने वाढत असलेली रोपे पूर्णपणे वाढत नाहीत. तसेच नदी-नाल्याच्या काठाशी असलेल्या झाडाच्या मुळाजवळची माती पावसामुळे किंवा पुरामुळे वाहून जाते आणि झाडाची मुळे उपडी पडतात अशा झाडांचा वामनवृक्षाकरीता आपण उपयोग करू शकतो. रोप वाटिकेमध्ये ज्या झाडांची मागणी नसते ती झाडे तशीच निसर्गाशी झगडत वाढतात. परंतु योग्य वाढ न झाल्याने ती वेडीवाकडी वाढतात, अशी झाडे बोन्साय साठी योग्य ठरतात. इतर ही प्रकारे वृक्ष आपण तयार करू शकतो. गुटीकलम, पाचर कलम , दाब कलम या पद्धतींचा वापर करून बोन्साय तयार करता येतो”, अशी माहिती ढवळे यांनी दिली. वामनवृक्षाची उंची किती असावी? वामनवृक्षाची उंची जास्तीत जास्त २४ इंच पर्यंत असावी. बेबी बोन्साय हा सहा इंचापेक्षा कमी असू शकतो. त्याचे खास तबक दोन-अडीच इंच उंचीचे वापरता. वामनवृक्षाची काळजी कशी घ्यावी? वामनवृक्षाचे तबक मातीचे असावे. सिमेंटचे शक्यतो टाळावे त्याच्यावरील कीड नियंत्रित करण्यासाठी महिन्यातून दोन वेळा किटकनाशक फवारणी करावी. कंपोस्ट खत किंवा गटारातील मैला खतचा उपयोग करावा. जास्त खत व ताज्या शेणाचा वापर करू नये. वामन वृक्षास झारीने पाणी दयावे. जास्त पाण्यामुळे झाडाची मुळे सडण्याची शक्यता असते. उन्हाळयात सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा पाणी दयावे. दुपारी चारनंतरची सूर्याची किरणे सरळ वामन वृक्षावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. हिरव्या जाळीचे आच्छादन करावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link