Collapsed classroom ceiling of zp school ridhora not repair yet

[ad_1]

अकोला, 30 जून : एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची बकाल अवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. शाळेच्या (School) दुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने, अशा बकाल शाळेतच विद्यार्थांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील रिधोरा गावातील जिल्हा परिषद शाळेवरील **(**Z.P School, Ridhora) पत्रे वादळी पावसात उडूण गेले. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची डागडूजी आवश्यक होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी छत नसलेल्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.   जिल्ह्यातील बाळापूर तालुुक्यातील रिधोरा गावात 125 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा आहे. ही शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. 228 इतकी शाळेची पटसंख्या आहे. उन्हाळी सुट्ट्या, आणि कोरोनामुळे यंदा शाळा उशाराने सुरू झाल्या आहेत. उत्साही वातावरणात विद्यार्थी शाळेत आले मात्र, शाळेवरील कोसळलेले छत पाहून विद्यार्थांचा उत्साह काही प्रमाणात कमी झाला आहे. शाळा खोल्यांवरील छत्र उडाल्याने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांना बसण्यास धोकादायक ठरत आहेत.   “अन्यथा शाळेला टाळे लावू” 28 डिसेंबर 2021 ला वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्तीकरुन छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहेत. शाळेवरील पत्रे उडाल्याने शाळेला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत शाळा समितीने जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही समस्या दूर झालेली नाही. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेची डागडुजी करुन गळती थांबवावी, अन्यथा शाळेला टाळे लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. हे वाचा – 
बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?
“तक्रार देऊनही डागडूजी नाही” 28 डिसेंबर 2021 ला शाळेचे छत उडून गेले तेव्हापासून शाळा समितीने वारंवार जिल्हा परिषदेला निवेदन, लेखी तक्रार दिली पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळेकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पत्रे बसण्याची मागणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परमानंद थोटे यांनी केली आहे. “हेतुपरस्पर शाळेकडे दुर्लक्ष” शाळेतील दुरावस्थेबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांना लेखी तक्रार दिली. मात्र, आतापर्यंत दुरुस्ती झालेली नाही. हेतुपरस्पर शाळेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी केला आहे. वाचा- 
बीडच्या मुलांनो इकडे लक्ष द्या! इथल्या ITI मध्ये 1-2 वर्षांचा कोर्स संपताच, लगेच लागतो जाॅब, वाचा SPECIAL REPORT
“वर्षभरातच शाळेला लागली गळती” बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर ग्रामपंचायतीकडून पत्रे बसविण्यात आली होती. मात्र, सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने शाळेचे पत्रे वाऱ्यामुळे उडाली. वर्षभरातच शाळेला गळती लागली, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दंदी यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *