Credit Card चं बिल डोकेदुखी बनलंय? ट्राय करा या पद्धती, उतरेल कर्जाचं ओझं

[ad_1]

नवी दिल्ली, 24 जुलै : देशभरात कोट्यवधी लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र गेल्या काही काळापासून क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट न करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नुकतीच ट्रान्सयूनियन सिबिलच्या एका रिपोर्टमधून कळालं आहे की, जून 2023 मध्ये क्रेडिट कार्डवर डिफॉल्टमध्ये वाढ झाली आहे. म्हणजेच लोक आपल्या फायनेंसला मॅनेज करण्यासाठी क्रेडिट कार्डवर जास्त पैसे खर्च करत आहेत. मात्र त्याचं रिपेमेंट करु शकत नाहीयेत. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचे बिलही भरायचं बाकी असण्याची शक्यता आहे. अशा वेळी क्रेडिट कार्डचे बिल तुमच्यासाठी डोकेदुखी बनू नये म्हणून आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता.

News18लोकमत


News18लोकमत

बिल न भरणाऱ्यांची संख्या का वाढतेय? क्रेडिट डिफॉल्ट वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये राहणीमानाचा वाढता खर्च, नोकरी गमावणे आणि आर्थिक मंदी यासारखी कारणं असू शकतात. देशात डिजिटल ई-कॉमर्सची वाढती लोकप्रियता आणि ऑनलाइन ट्रांझेक्शनमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांना खरेदी करणे आणि कर्ज घेणे खूप सोपे झालेय. यामुळे पैशांची पर्वा न करता ते अधिक खर्च करतात. मात्र ज्यावेळी क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात.
Pin Secure : डेबिट-क्रेडिट कार्ड पिन सिक्योर ठेवण्याचे 6 फॉर्म्यूले, मिळेल सुपर सिक्योरिटी!
बॅलेन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून बिल पेमेंट तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही एक ट्रिक यूज करु शकता. तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी एका क्रेडिट कार्डमधून दुसऱ्या क्रेडिट कार्डमध्ये बॅलेन्स ट्रान्सफर करू शकता. आजकाल, क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बहुतांश बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा देतात. यासाठी तुम्ही ज्या क्रेडिट कार्डने बिल भरता त्याची क्रेडिट लिमिट इतर क्रेडिट कार्डपेक्षा जास्त असावी.
Card Portability: क्रेडिट आणि डेबिट कार्डही करता येतील पोर्ट, पाहा RBI ने काय म्हटलंय
थकबाकीच्या रकमेचे ईएमआयमध्ये करा रुपांतर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी एकरकमी पैशाची व्यवस्था करू शकत नसाल, तर थकबाकीची रक्कम EMI मध्ये रूपांतरित करण्याचा ऑप्शन देखील आहे. याच्या मदतीने तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल सोप्या हप्त्यांमध्ये भरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *