HDFC बँकेची जास्त व्याज देणारी FD उद्या होणार बंद! सोडू नका अखेरची संधी

[ad_1]
मुंबई, 6 जुलै : एचडीएफसी बँकेची स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्किमची लास्ट डेट जवळपास संपत आली आहे. येत्या 7 जुलै 2023 ला म्हणजेच उद्या ही स्किम बंद केली जाणार आहे. ही स्पेशल एफडी स्किम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ज्यांचे नाव सिनियर सिटीझन केयर आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, याला अनेक वेळा एक्सटेंशन म्हणजेच मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आता ती बंद केली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक म्हणून एफडीमध्ये अधिक व्याज मिळवायचे असेल तर उद्यापर्यंतच त्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे.
News18लोकमत
सिनियर सिटीझन केयर एफडी स्किममध्ये नेमकं काय? सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या टर्म डिपॉझिटवर 0.75% जास्त व्याज मिळते. ही योजना 18 मे 2020 रोजी सुरू करण्यात आली आणि पात्र गुंतवणूकदार यामध्ये 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकतात. या स्पेशल एफडी स्किमअंतर्गत, ग्राहकांना नवीन बुक केलेल्या एफडीवर त्यांचे नूतनीकरण होईपर्यंत जास्त व्याज मिळते आणि ते सांगितलेल्या कालावधीसाठी जास्त व्याज मिळवू शकतात. मात्र ही स्पेशल एफडी स्किम नॉन-रेसीडेंट इंडियन्ससाठी नाही.
Aadhaar-PAN linking: 1 जुलैपूर्वी आधार-पॅन लिंक केलं नाही? आता पॅन अॅक्टिव्ह कसं करायचं?
त्याचे व्याजदर काय आहेत HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, ज्येष्ठ नागरिकांना आधीच 0.50 टक्के अधिक व्याज मिळत आहे. या सिनियर सिटीझन केयर स्किममध्ये त्यांना 0.25 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना या विशेष एफडीमध्ये 0.75 टक्के अधिक व्याज मिळते. या योजनेचा व्याज दर 7.75 टक्के आहे. हे 5 कोटी रुपयांपेक्षा कमी टर्म डिपॉझिटसाठी आहे आणि त्याचा टाइमफ्रेम 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे आहे. ही स्किम फक्त 18 मे 2020 ते 7 जुलै 2023 पर्यंत आहे आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांनी या अंतर्गत विशेष एफडी उघडली आहे त्यांनाच हे वाढीव व्याज मिळेल.
Bank Account: तुम्ही आपल्या देशात किती बँक अकाउंट ओपन करु शकता? काय सांगतो RBI चा नियम?
HDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर FD योजनांचे व्याज जाणून घ्या -7 ते 29 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या FD वर 3.50% व्याज मिळते. -30-45 दिवसांच्या FD वर 4% व्याज देते, -46 दिवसांपासून ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5% व्याज देते. -6 महिने, 1 दिवस ते 9 महिन्यांपर्यंतच्या FD वर 6.25% व्याज दिले जाते. -9 महिने, 1 दिवस ते 1 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळतं. -1 वर्ष ते 15 महिन्यांपर्यंतच्या FD वर 7.10 टक्के व्याज मिळतं. -15 महिने ते 18 पेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.60 टक्के व्याज दिले जाते. – 18 महिने ते 4 वर्षे 7 महिन्यांच्या FD वर 7.50% व्याज देते. -2 वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या FD वर 7.70% व्याज मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link