Housing prices are likely to fall as construction materials prices drop mhpw gh

[ad_1]
मुंबई, 7 जून : सध्या जमिनीचे आणि घरांचे दर (House Prices) मोठ्या प्रमाणात वाढल्यानं घरखरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई पणाला लावावी लागते. दिल्ली-मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये (Cosmopolitan Cities) स्वत:च्या मालकीचं तर सोडाच पण भाड्यानं घर घेणंदेखील सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. मात्र, नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्या किंवा बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आता एक चांगली बातमी आली आहे. सरकारचे प्रयत्न आणि काही हंगामी घटकांमुळे बांधकाम साहित्याच्या (Construction Materials) किमतींमध्ये विक्रमी घट झाली आहेत. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून बांधकाम साहित्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या लोखंडी सळयाच्या किमतीमध्ये (Iron Rod Price) दररोज घसरण होत आहे. याशिवाय सिमेंट (Cement) आणि विटांचे (Bricks) दरही घसरले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या मुंबईमध्ये 55 हजार 200 रुपये प्रतिटन, नागपूरमध्ये 51 हजार रूपये प्रतिटन, जालन्यामध्ये 54 हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे लोखंडी सळया मिळत आहेत.
आज तक
ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. घर किंवा इतर कोणत्याही बांधकामात लोखंडी रॉड ज्याला स्टील असं म्हटलं जातं, ती सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे. लोखंडी रॉडच्या मजबुतीवर त्या इमारतीचा टिकाऊपणा अवलंबून असतो. घरांचे छप्पर, बीम आणि खांब बांधण्यासाठी स्टील मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. इमारतीच्या पायामध्येही (Foundation) लोखंडाचा वापर होतो. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च 2022 मध्ये या लोखंडी रॉडच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मार्चमध्ये काही ठिकाणी या किमती 85 हजार रुपये प्रतिटनापर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, सध्या या दरामध्ये अचानक घसरण झाली आहे. आता अनेक ठिकाणी 45 हजार रुपये प्रतिटनापर्यंत लोखंडी रॉडचे दर खाली आले आहेत. Tata ग्रुपच्या ‘या’ कंपनीमुळे गुंतवणूकदार बनले कोट्यधीश, 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर या घटकांमुळे घसरल्या किमती गगनाला भिडणारी महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील करही कमी केला आहे. यानंतर देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी त्याच्या निर्यातीवरील कर वाढवण्यात आला. याशिवाय इतर काही घटकही अनुकूल आहेत. पावसाळा सुरू होताच बांधकामाचे काम कमी होऊ लागते, त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणीही कमी होऊ लागते. रिअल इस्टेट क्षेत्रातील (Real Estate Sector) वाईट परिस्थितीही बांधकाम साहित्याच्या किमती कमी होण्यास कारणीभूत ठरली आहे. या कारणांमुळे विटा, सिमेंट, रॉड, वाळू यासारख्या वस्तूंची मागणी आणि पर्यायाने किंमती कमी झाल्या आहेत. स्टीलवरील निर्यात शुल्क वाढ सरकारने अलीकडेच स्टीलवरील निर्यात शुल्कात (Export Duty) वाढ केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात स्टील उत्पादनांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यावर्षी मार्चमध्ये बांधकाम स्टीलची किरकोळ किंमत 85 हजार रुपये प्रति टनावर पोहोचली होती, ती आता 45 ते 50 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. गेल्या काही महिन्यांत केवळ स्थानिकच नाही तर ब्रँडेड स्टीलच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. सध्या ब्रँडेड स्टीलची किंमत 80 ते 85 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. मार्च 2022 मध्ये, ब्रँडेड स्टीलचे दर प्रति टन 1 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचले होते. LIC शेअर होल्डर्सना Paytm ची आठवण; महिनाभरात एक लाख कोटींहून अधिक नुकसान खाली बांधकाम स्टीलच्या किरकोळ किमतींमध्ये कशी घसरण झाली ते दाखवण्यात आले आहे. » नोव्हेंबर 2021 : 70 हजार रुपये प्रतिटन » डिसेंबर 2021 : 75 हजार रुपये प्रतिटन » जानेवारी 2022 : 78 हजार रुपये प्रतिटन » फेब्रुवारी 2022 : 82 हजार रुपये प्रतिटन » मार्च 2022 : 83 हजार रुपये प्रतिटन » एप्रिल 2022 : 78 हजार रुपये प्रतिटन » मे 2022 (सुरुवात) : 71हजार रुपये प्रतिटन » मे 2022 (शेवटचा आठवडा): 62-63 हजार रुपये प्रतिटन » जून 2022 (सुरुवात): 48-50 हजार रुपये प्रतिटन खालील तक्त्यामध्ये भारतातील प्रमुख शहरांमधील सध्याचे स्टील दर दिले आहेत. हे दर 4 जून 2022 रोजी नोंदवण्यात आले आहेत. आयर्नमार्ट (Ironmart) वेबसाइट या किमतींच्या हालचालींवर लक्ष ठेवते. दर आठवड्याला नवीन किमती अपडेट होतात. » मुंबई (महाराष्ट्र): 55 हजार 200 रुपये प्रतिटन » नागपूर (महाराष्ट्र) : 51 हजार रुपये प्रतिटन » जालना (महाराष्ट्र): 54 हजार रुपये प्रतिटन » दुर्गापूर (पश्चिम बंगाल): 45 हजार 300 रुपये प्रतिटन » कोलकत्ता (पश्चिम बंगाल): 45 हजार 800 रुपये प्रती टन » रायगढ (छत्तीसगढ): 48 हजार 700 रुपये प्रतिटन » रुरकेला (ओडिशा): 50 हजार रुपये प्रतिटन » हैदराबाद (तेलंगाना): 52 हजार रुपये प्रतिटन » जयपूर (राजस्थान): 52 हजार 200 रुपये प्रतिटन » भावनगर (गुजरात): 52 हजार 700 रुपये प्रतिटन » मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश): 52 हजार 900 रुपये प्रतिटन » गाजियाबाद (उत्तर प्रदेश): 53 हजार रुपये प्रतिटन » इंदुर (मध्य प्रदेश): 53 हजार 500 रुपये प्रतिटन » गोवा: 53 हजार 800 रुपये प्रतिटन » मंडी गोविंदगढ (पंजाब): 54 हजार 300 रुपये प्रतिटन » चेन्नई (तमिळनाडू): 55 हजार रुपये प्रतिटन » दिल्ली: 55 हजार रुपये प्रतिटन » कानपूर (उत्तर प्रदेश): 57 हजार रुपये प्रतिटन विविध घटकांमुळे सध्या बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये घट होत आहे. त्यामुळे तुम्हालाही जर घराचे बांधकाम सुरू करायचे असेल तर ही एक चांगली संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link