IRCTC चं खास टूर पॅकेज! फिरुन या हरिद्वार, वैष्णो देवी आणि गोल्डन टेम्पल

[ad_1]

मुंबई, 11 जुलै : IRCTC ने वैष्णोदेवी टूर पॅकेज सादर केले आहे. या टूर पॅकेजद्वारे भाविकांना स्वस्तात वैष्णोदेवीचे दर्शन घेता येईल. हे टूर पॅकेज एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. हे टूर पॅकेज कोलकाता येथून सुरू होणार आहे.
IRCTC
चे वैष्णो देवी टूर पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 17,700 रुपये आहे. या टूर पॅकेजचे नाव माता वैष्णोदेवी विथ उत्तर भारत दर्शन (EZBG07) आहे. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 11 दिवसांचं आहे IRCTC चं वैष्णो देवी टूर पॅकेज IRCTC चे वैष्णो देवी टूर पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी आहे. या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 17,700 रुपये आहे. या टूर पॅकेजचे नाव माता वैष्णोदेवी विथ उत्तर भारत दर्शन (EZBG07) आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये हरिद्वार, ऋषिकेश, माता वैष्णो देवी, सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, ताजमहाल, मथुरा, वृंदावन आणि अयोध्या या ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. या टूर पॅकेजमध्ये बोर्डिंग आणि डिबोर्डिंग कोलकाता, खरगपूर, मिदनापूर, टाटानगर, पुरोलिया, रांची, बोकारो स्टील सिटी, धनबाद, हजारीबाग आणि डीडी उपाध्याय रेल्वे स्टेशनवरुन केले जाईल.
IRCTC Tour Package: 15 हजार रुपयात चार दिवस गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या पॅकेज डिटेल्स
पर्यटक हे टूर पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकतात आणि 8595904082 आणि 85955937902 नंबरवर कॉल करून बुक करू शकतात. या टूर पॅकेजचे इकॉनॉमी क्लासचे तिकीट रु. 17700 प्रति व्यक्ती आहे. दुसरीकडे, जर तुम्ही स्टँडर्ड क्लासमध्ये प्रवास केला तर तुम्हाला प्रति व्यक्ती 27,400 रुपये भाडे द्यावे लागेल. त्याच वेळी, कंफर्ट क्लासमध्ये प्रति व्यक्ती भाडे 30,300 रुपये असेल.
IRCTC: व्हिएतनाम आणि कंबोडियाची सैर करायचीये? ‘हे’ आहे 9 दिवसांच खास टूर पॅकेज
या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना हरिद्वारमधील भारत माता देवी मंदिर आणि हर की पौरी येथे नेण्यात येणार आहे. यासोबतच गंगा आरतीमध्ये पर्यटकांचा समावेश करण्यात येणार आहे. पर्यटक ऋषिकेशमधील राम झुला आणि त्रिवेणी घाटाला भेट देतील. पर्यटकांना टूर पॅकेजमध्ये आग्रा येथील ताजमहाल पाहायला मिळेल. त्याचवेळी राम अयोध्येतील जन्मभूमी मंदिराला भेट देता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, IRCTC पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून प्रवासी देश-विदेशात स्वस्तात प्रवास करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *