IRCTC ने आणलंय श्रीलंकाचं खास टूर पॅकेज! पाहा रामायणासंबंधित खास ठिकाणं

[ad_1]

IRCTC Sri Lanka Tour Package: IRCTC ने पर्यटकांसाठी श्रीलंका टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवासी श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित असलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकतील. हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रीलंका हे रावणाचे घर होते. श्रीलंका हे नाव रावणाच्या लंकेवरून आले आहे.
आयआरसीटीसी
च्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना श्रीलंकेतील ठिकाणांना भेटी देता येणार आहेत. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

News18लोकमत


News18लोकमत

IRCTC च्या अधिकृत ट्विटर हँडलवर IRCTC च्या या टूर पॅकेजची माहिती देण्यात आली आहे. या टूर पॅकेजचं नाव आहे ट्रेल्स ऑफ रामायण इन श्रीलंका विथ कथारागम आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना रामायणाशी संबंधित ठिकाणांवर नेण्यात येणार आहे. तुम्हाला श्रीलंकेला भेट द्यायची असेल तर हे टूर पॅकेज तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण यामध्ये IRCTC तुमच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करेल आणि तुम्ही श्रीलंकेच्या ठिकाणांना स्वस्तात भेट देऊ शकता.
Indian Railway: विमानाप्रमाणेच ट्रेनमध्येही सामान नेण्याची असते लिमिट! जास्त नेल्यास भरावा लागू शकतो दंड
हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे IRCTC चे हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. हे टूर पॅकेज चेन्नईपासून सुरू होणार असून पर्यटक विमानाने प्रवास करतील. या टूर पॅकेजची सुरुवातीची किंमत 63,500 रुपये आहे. आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये कँडी, कोलंबो, कथारागम, नुआरा एलिया आदी ठिकाणांना भेटी देता येचतील. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचे बुकिंग टुरिस्ट रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येते.
IRCTC ने आणलंय खास दिव्य दक्षिण यात्रा टूर पॅकेज! कमी पैशांत होईल देवदर्शन
किती भाडे द्यावे लागेल? या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 90,500 रुपये भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 65,800 रुपये भाडे द्यावे लागेल. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 63500 रुपये भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही या टूर पॅकेजमध्ये 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला पलंगासह मुलांच्या भाड्यासाठी 45,500 रुपये द्यावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *