Mega block on Central Railway on Sunday

[ad_1]
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील लोकल करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांत थांबणार नाही. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
ब्लॉकदरम्यान मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध होणार नाही. ब्लॉक कालावधीत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल सेवा विद्याविहार – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉकदरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध होणार नाही. ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन लोकल सकाळी १०.०७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ठाणेदरम्यान धावेल. तर, ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ३.५७ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण लोकल असेल.
ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना होईल. तर, ब्लाॅकनंतरची पहिली अप लोकल कल्याण येथून दुपारी ३.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना होईल.
ट्रान्स हार्बर मार्ग
कुठे : ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाण्याहून वाशी / नेरुळ / पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील आणि पनवेल / नेरुळ / वाशी ते ठाणे अप मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
[ad_2]
Source link