Nashik : ॲम्ब्युलन्स चालकाच्या प्रामाणिकपणाचं होतंय सर्वत्र कौतुक; नेमकं कारण काय, ते जाणून घ्या

[ad_1]

नाशिक, 11 जून : नाशिकच्या नारायण जेजुरकर या ॲम्ब्युलन्स चालकाचं (Ambulance driver) सर्व स्तरातून कौकुत सुरू आहे. कारणही तसंच आहे. घडलं असं की, नाशिकच्या 108 ॲम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करणाऱ्या नारायण जेजूरकर या कर्मचाऱ्याला ॲम्ब्युलन्सची साफ सफाई करत असताना पेशंटची पर्स सापडली. या पर्समध्ये 2 सोन्याच्या पोत, 2 मोबाईल आणि काही रक्कम असा ऐवज सापडला. त्याने प्रामाणिकपणे सर्व ऐवज पंचवटी पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात ती पर्स दिली. त्याचा हा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्याचे कौतुक केले. (Ambulance driver honesty in nashik) वाचा : 
Navi Mumbai: नवी मुंबईत मोठी दुर्घटना, इमारतीचा काही भाग कोसळला, अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती
सध्या नाशकात गुन्हेगारीच थैमान सुरू आहे. लूटमार, चैन स्नॅचिंग, घरफोडी यांसारख्या घटना दिवसागणिक घडत आहेत.कि रकोळ कारणावरून एकमेकांचा जीव घेण्यावर अनेकांची मजल जात आहे. मात्र, अशा स्थितीत नारायण जेजूरकर यांनी सापडलेली पर्स, त्यामधील सर्व दागिने, मोबाईल पोलिसांकडे परत केले. त्यामुळे अजूनही काही नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा अजुनही शिल्लक आहे, याची प्रचिती आली. वाचा : 
हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता दुचाकी; अचानक आरामात झोपला, VIDEO पाहून व्हाल शॉक
ही पर्स नेमकी कोणाची आहे, कोणत्या रुग्णाची आहे, त्यासंदर्भात अद्याप पोलिसांनाही माहिती मिळालेली नाही. मात्र पोलीस याचा शोध घेत आहेत. या संदर्भात नारायण जेजुरकर म्हणाले की, “दादा, मी ॲम्ब्युलन्स चालवतो. दररोज अनेकांचा जीव वाचवतो आणि मीच जर ही पर्स लांबवली असती. तर माझ्या मनाने मला कधीच माप केलं नसतं. त्यामुळे असा कुणाचा ऐवज घेऊन मी मोठा होणार नाही. त्यामुळे माझ्या मनाने निर्णय घेऊन ती पर्स पोलिसांच्या ताब्यात दिली.” नाशिकच्या ॲम्ब्युलन्स चालकाचा प्रामाणिकपणा पाहून तुम्हीही त्याच्यावर वर कौतुकाची थाप मारल्याशिवाय राहणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *