Success Story: घर गहाण ठेवलं, फॉर्च्युनर विकून सुरू केलं स्टार्टअप; दोनदा अपयशी झाल्यानंतर उभारली कोट्यवधींची कंपनी

[ad_1]

आपल्या देशात अनेक तरुण उद्योजक आहेत, ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता स्वतःचा बिझनेस सुरू केला. काहींना त्यात अपयश आलं, तर काही जण यशस्वी झाले. नीरज सिंह हा त्यातलाच एक उद्योजक आहे. त्याची कहाणी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेला साजेशी आहे. दोन स्टार्टअप फेल झाल्यानंतर तिसऱ्या स्टार्टअपमध्ये त्याला यश मिळालं आणि आता त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन हजारो कोटी आहे. या संदर्भातलं वृत्त ‘डीएनए’ने दिलं आहे. जानेवारी 2014मध्ये दोन स्टार्टअप्स यशस्वी करण्यात अपयश आल्यानंतर आपल्याला तिसऱ्या प्रयत्नात तरी यश मिळेल, अशी आशा नीरज सिंहला होती. त्याचा आत्मविश्वास डगमगत होता; पण तिसरा हा त्याचा शेवटचा प्रयत्न असणार होता. तिसऱ्यांदा मात्र तो खचला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याचं स्टार्टअप यशस्वी झालं.
IAS Success Story: प्रेमात धोका मिळाल्यावर IAS व्हायचं ठरवलं आणि करून दाखवलं, वाचा रिअल लाइफ ‘सत्तू’ची कहाणी
नीरज सिंह झारखंडमधल्या डाल्टनगंजचा रहिवासी आहे. तो शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकात असायचा. त्याने पहिल्याच प्रयत्नात आयआयटी पास केली. आयआयटी रुरकीमध्ये आर्किटेक्चरल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि आयआयटी दिल्लीच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग प्रोग्रामला प्रवेश घेतला. त्याने लोकस एज्युकेशन हे पहिलं स्टार्टअप सुरू केलं; पण ते वेळेच्या खूप पुढे असल्याने त्याला बंद करावं लागलं. त्याचं दुसरे स्टार्टअप डिसेंबर 2014मध्ये बंद झालं. 2016मध्ये नीरजने ‘स्पिनी’ नावाने वापरलेल्या कारच्या विक्रीचं मार्केट सुरू केलं. त्याने रिफर्बिश्ड कार विकणारा प्लॅटफॉर्म सुरू केला होता. अनेकांना त्याची ही कल्पना आवडली नाही; पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद इतका चांगला होता की दुसऱ्या वर्षी कंपनीचा रेव्हेन्यू 4.6 कोटी रुपये होता. नीरज सिंहने घर गहाण ठेवून पर्सनल लोन घेतलं आणि त्याला गुंतवणूकदारांनी 100 वेळा नाकारलं होतं. त्याने त्याची फॉर्च्युनर कार आणि इतर गोष्टी विकल्या. तसंच मित्र आणि कुटुंबीयांकडूनही पैसे उधार घेतले होते.
Success Story: वडील केंद्रात मंत्री आणि मुलाने सुरू केली स्टार्टअप कंपनी, पाहा ‘हा’ कोणत्या नेत्याचा मुलगा
2019मध्ये परिस्थिती बदलली. नीरजने 26 मिलियन डॉलर्सच्या व्हॅल्युएशनमध्ये 11 मिलियन डॉलर्सचा निधी उभारला. काही महिन्यांनंतर त्याने 138 मिलियन डॉलर्सच्या व्हॅल्युएशनमध्ये 38 मिलियन डॉलर्स निधी मिळवला. आर्थिक वर्ष 2022मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 180 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 3000 कोटी रुपये होता. 2021मध्ये नीरजने 280 मिलियन डॉलर्सचा निधी मिळवला. त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन 1.75 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 14470 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *