Uk man selling beach at 50 lakh rupees on one condition mhpl

[ad_1]
लंडन, 10 फेब्रुवारी : समुद्रकिनारी आपलं एक घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. कित्येक सेलिब्रिटींची घरं, बंगले तर अशीच बीचवर असतात. ज्यामुळे त्यांच्या घराच्या खिडकीतून, बाल्कनीतून सुंदर असा निराशार समुद्र दिसतो. समुद्रकिनाऱ्यावरील घर हे तितकंच महागडंही असतं. कोट्यवधींच्या घरात त्यांच्या किमती असतात. त्यामुळे सर्वसामान्यांचं हे स्वप्नं स्वप्नंच राहतं. पण आता समुद्रकिनारी घर काय संपूर्ण बीचचेच तुम्ही मालक व्हाल तेसुद्धा फक्त 50 लाख रुपयांत (Beach On Sale). सामान्यपणे प्रॉपर्टी खरेदी-विक्री म्हटलं की आपल्यासमोर जमीन, घर हेच येतं. पण तुम्ही कधी समुद्रकिनाऱ्याच्या खरेदी-विक्रीबाबत ऐकलं आहे का? पण एका व्यक्तीने समुद्रकिनारा विक्रीला काढला आहे. यूकेतील 57 वर्षांच्या साइमन एडरली (Simon Adderley) बीच विकतो आहे. यूकेच्या स्केग्नेसमध्ये हा बीच आहे. साइमन गेल्या 15 वर्षांपासून या बीचचा मालक आहे. 2007 साली त्याने हा समुद्रकिनारा खरेदी केला होता. आता त्याने तो विक्रीला काढला आहे. ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे. हे वाचा –
OMG! 13 वर्षीय मुलाने एकट्यानेच बनवले इतके पदार्थ; फक्त आकडा वाचूनच चक्कर येईल
प्रॉपर्टीच्या मानाने 50 लाख रुपये ही किंमत खूपच कमी आहे. त्यामुळे हा बीच खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. आतापर्यंत 750 लोकांना हा बीच खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली. नॅशनल ट्रस्टच्या मते, यापैकी 250 लोक बीच खरेदीबाबत खूपच गंभीर होते. या बीचची किंमत कमी असली तरी तो खरेदी करण्यासाठी साइमनने एक अट ठेवली आहे. ही अट पूर्ण करणाऱ्यालाच तो आपला हा बीच विकणार आहे. साइमनला असा ग्राहक हवा आहे जो या बीचचा वापर करेल. म्हणजे त्याच्यामध्ये बीचबाबत एक वेगळीच भावना असायला हवी. साइमनच्या मते, हा बीच त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे हा बीच खरेदी करणाराही अशाच ऊर्जेच्या शोधात असायला हवा, अशी त्याची अपेक्षा आहे. जो कुणी हा बीच खरेदी करायला येतो, त्याला साइमन काही प्रश्न विचारतो. जर त्याचं उत्तर त्याला योग्य नाही वाटलं तर तो डील कॅन्सल करतो. माहितीनुसार एका व्यक्तीने या बीचसाठी साइमनला ब्लँक चेकही दिला होता पण साइमनने त्यालाही हा बीच दिला नाही. त्याच्या मते, हा बीच शांतता, समाधानासाठी आहे. इथं प्राणी येतात. कोणत्या लालची व्यक्तीला हा बीच देणं योग्य नाही. हे वाचा –
देसी जुगाड, तरुणांनी मातीपासून बनवली Bugatti कार; रस्त्यावर येताच लोकं म्हणतात..
सुरुवातीला तो ग्राहकाचं हा बीच खरेदीमागील उद्दिष्ट जाणून घेईल, त्यानंतरच हा बीच त्याला देईल. आता या बीचचा मालक कोण होणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link