UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल अखेर लागला; असा चेक करा तुमचा रिझल्ट – News18 लोकमत

[ad_1]
मुंबई, 12, जून: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला आहे. UPSC प्रिलिम्समध्ये बसलेले उमेदवार upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. UPSC प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी झाली. UPSC ने त्यांच्या वेबसाइटवर एक PDF फाइल अपलोड केली आहे ज्यामध्ये प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर आणि नावे आहेत. नक्की कसा चेक करायचा निकाल हे जाणून घेऊया.
MHT CET 2023 Result: MHT CET परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; या डायरेक्ट लिंकवरून लगेच चेक करा रिझल्ट
अशा पद्धतीनं चेक करा तुमचा निकाल UPSC प्रिलिम्स निकाल पाहण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. येथे मुख्यपृष्ठावर, ‘लिखित निकाल – नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023’ या लिंकवर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक PDF फाइल दिसेल. या पीडीएफ फाइलमध्ये पात्र उमेदवारांचे रोल नंबर नमूद केले जातील. या यादीत तुमचा रोल नंबर शोधा आणि भविष्यातील संदर्भांसाठी PDF फाइल सेव्ह करा.
परीक्षा न देता विद्यार्थी पास, पीएचडी सुरू! परीक्षा देऊन विद्यार्थिनी मात्र नापास
कधी होणार मेन्स परीक्षा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा 2023 15 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली जाईल. प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेले उमेदवार या परीक्षेला बसतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link