Yes Bank च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ खास सुविधा

[ad_1]

मुंबई, 6 जुलै : तुम्ही डिजिटल पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. आता एनपीसीआय द्वारे संचलित भीम अ‍ॅपवर यस बँकेचा रुपे क्रेडिट कार्ड लाइव्ह झाला आहे. म्हणजेच तुम्ही आता येस बँकेच्या रुपे क्रेडिट कार्ड भीम अ‍ॅपशी लिंक करु शकता आणि कोणत्याही दुकानातील यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करुन यस बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डवरुन पेमेंट करु शकता.

News18लोकमत


News18लोकमत

BHIM अ‍ॅपवर आतापर्यंत 9 बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड लिंक करू शकता. सध्या येस बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड भीम अ‍ॅपद्वारे वापरले जाऊ शकते. तुम्ही UPI पेमेंट अगदी तशाच प्रकारे करू शकता जसे तुम्ही बँक अकाउंटमधून करता. फक्त इथे तुमच्या रुपे क्रेडिट कार्डमधून पैसे कापले जातील.
Credit Card चा पूर्ण फायदा घ्यायचाय? मग या 3 पद्धतींनी करा वापर, वाचतील भरपूर पैसे
2022 मध्ये सुरु झाली होती Rupay Credit Card on UPI ची सुविधा रुपे क्रेडिट कार्ड ऑन यूपीआय सुविधा गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होते. आता तुम्ही कोणत्याही दुकानात स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकाल. मात्र, RuPay क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही फक्त व्यापारी UPI QR कोड स्कॅन करून किंवा ऑनलाइन व्यापाऱ्यांना पेमेंट करू शकता. P2P पेमेंट करू शकत नाही. BHIM सोबतच काही बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड Google Pay, Paytm, PhonePe, PayZapp, Freecharge सारख्या निवडक UPI अ‍ॅप्सवरही लाइव्ह झाले आहेत.
Free Insurance: ‘या’ 4 गोष्टींवर तुम्हाला मिळते फ्री इन्शुरन्स, अनेकांना तर माहितीही नसेल!
रुपे क्रेडिट कार्ड भीम अ‍ॅपशी कसं लिंक करायचं? -सर्वात आधी भीम अ‍ॅप ओपन करा. -यानंतर लिंक्ड बँक अकाउंटवर क्लिक करा. -आता + वर क्लिक केल्यावर Add Account मध्ये 2 ऑप्शन दिसतात. Bank Account आणि Credit Card. -Credit Card वर क्लिक केल्यानंतर, संबंधित कार्डवर क्लिक केल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक -केलेल्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स येईल. -आता क्रेडिट कार्डची अखेरचे 6 अंक आणि व्हॅलिडिटी टाका. -यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका. -यूपीआय पिन तयार करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. -आता मर्चेंट UPI OR कोड स्कॅन करा आणि रुपे क्रेडिट कार्ड सेलेक्ट करुन यीपीआय पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *